शेअर करा

दीर्घकाळासाठी आपल्या संपत्तीत वाढ करण्यासाठी आपण वेग-वेगळ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. काही लोक शेअर्सला (Share Market Information in Marathi) जोखमीची गुंतवणूक म्हणून पाहतात, आणि अनेक अभ्यासांनी हे सिद्ध सुद्धा केले आहे की तुमचे पैसे योग्य शेअर्समध्ये दीर्घ कालावधीसाठी (5 ते 10 वर्षे) ठेवल्याने महागाईला मात देणारा परतावा तुम्हाला मिळू शकतो व चुकीच्या शेअर्समध्ये गुंतूवणूक केल्याने नुकसान देखील होते. पैशाची गुंतूवणूक करण्यासाठी शेअर मार्केट हा एक चांगला पर्याय ठरू शकतो, परंतु त्यासाठी शेअर मार्केट चे भरपूर ज्ञान असणे आवश्यक आहे. आपल्या पैकी बरेच लोक आहेत ते शेअर मार्केट ला सट्टा बाजाराची उपमा देतात कारण त्यांना शेअर मार्केट बद्दल योग्य माहिती नसते तर मित्रांनो आजच्या या आमच्या विशेष लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शेअर मार्केट (Share Market Wikipedia in Marathi) बद्दल संपूर्ण महत्वाची माहिती सांगणार आहोत, जसे की शेअर मार्केट काय आहे (What is Share Market?), शेअर मार्केट मध्ये गुंतूवणूक कशी करावी? (How to invest in Share Market?), शेअर मार्केट चे फायदे आणि नुकसान (Share Market Benefits), योग्य शेअर कसे निवडावे (How to Choose Right Share to Invest), इत्यादि तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यन्त वाचावी.

What is Share Market

बर्‍याचदा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की, शेअर मार्केट आहे तरी काय? (Share Market Information in Marathi) तर मित्रांनो, शेअर मार्केट म्हणजे जिथे शेअर्सची खरेदी आणि विक्री होते त्यालाच शेअर मार्केट म्हणतात. Stock Market आणि Share Market हे दोन्ही शब्द एकच आहेत. या दोघांमध्ये महत्त्वाचा फरक असा आहे की Stock Market मध्ये तुम्हाला बॉण्ड्स, म्युच्युअल फंड, डेरिव्हेटिव्ह तसेच कंपन्यांचे शेअर्स यासारख्या गोष्टींची खरेदी विक्री तुम्हाला करता येते. आणि Share Market मध्ये फक्त शेअर्सची ट्रेडिंग तुम्ही करू शकता. शेअर मार्केट मधील मुख्य आणि महत्वाचा घटक म्हणजे Stock Exchange होय.

Stock Exchange च्या मदतीनेच शेअर्सची खरेदी आणि विक्री केली जाऊ शकता.  आपल्या भारतामध्ये दोन स्टॉक एक्सचेंज आहेत आणि ते म्हणजे BSE (Bombay Stock Exchange) आणि NSE (National Stock Exchange) होय. BSE चे मुख्यालय मुंबईला तर NSE चे मुख्यालय हे दिल्लीला आहे. आणि या दोन्ही Stock Exchange वर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकार ने SEBI (Securities and Exchange Board of India) ची निर्मिती केली आहे. शेअर मार्केट मध्ये होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी SEBI एक नियंत्रक बोर्ड म्हणून काम करते.

What is SEBI?

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे असते. म्हणून, गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी त्यांचे नियमन करणे आवश्यक आहे. 1988 पासून भारत सरकारने शेअर बाजारांची नियामक संस्था म्हणून SEBI ची स्थापना केली तेव्हापासून भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ (SEBI) ला भारतातील दुय्यम आणि प्राथमिक बाजारांवर देखरेख करण्याचे बंधनकारक आहे. 1992 च्या SEBI कायद्याद्वारे अल्पावधीतच सेबी एक स्वायत्त संस्था बनली.

शेअर बाजाराचा विकास आणि नियमन या दोन्हीची जबाबदारी सेबीकडे आहे. अंतिम गुंतवणूकदारांना सिक्युरिटीजमधील सुरक्षित आणि पारदर्शक व्यवहारांचा फायदा मिळावा हे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सर्वसमावेशक नियामक उपायांसह ते नियमितपणे बाहेर पडतात.

SEBI Basic Objectives

  • स्टॉकमधील गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे
  • शेअर बाजाराच्या विकासाला चालना देणे
  • शेअर बाजाराचे नियमन करणे

Types of Share Market

शेअर मार्केट चे मुख्य दोन प्रकार आहेत ते म्हणजे Primary Share Market आणि Secondary Share Market.

Primary Share Market

या प्रकारामध्ये कंपनी विशिष्ट प्रमाणात शेअर्स जारी करण्यासाठी आणि पैसे उभारण्यासाठी नोंदणीकृत होते. याला स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध (Share Market Listing) होणे असेही म्हणतात. कंपनी लोकांना IPO (Initial Public Offering) मध्ये इन्वेस्ट करण्यास प्रवृत्त करते.

Secondary Share Market

नवीन सिक्युरिटीज प्राइमरी मार्केटमध्ये विकल्या गेल्या की, या शेअर्सची दुय्यम बाजारात खरेदी-विक्री केली जाते. हे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीतून बाहेर पडण्याची आणि समभागांची विक्री करण्याची संधी देते. दुय्यम बाजारातील व्यवहार हे अशा व्यापारांना संदर्भित केले जातात जेथे एक गुंतवणूकदार प्रचलित बाजारभावाने किंवा दोन्ही पक्ष सहमत असलेल्या कोणत्याही किंमतीवर दुसऱ्या गुंतवणूकदाराकडून शेअर्स खरेदी करतो. साधारणपणे, गुंतवणूकदार दलाल सारख्या मध्यस्थाचा वापर करून असे व्यवहार करतात, जो ही सर्व प्रक्रिया सुलभ करतो येथे दलाल म्हणजे आपण ज्याच्या मार्फत शेअर विकत घेतो किंवा विकतो, भारतात असे बरेच SEBI Registered Companies दलाल आहेत ज्यांच्या मर्कट आपण शेअर मार्केट मध्ये व्यवहार करू शकतो.

How to Invest in Share Market?

शेअर मार्केट मध्ये गुंतूवणूक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला कुठल्या तरी Broker कडून Trading Account Open करावे लागेल, आधी ही प्रक्रिया खूपच किचकट होती परंतु सध्या सर्व गोष्टी डिजिटल झाल्या असल्या मुळे तुम्ही घरी बसूनच Trading Account Open करू शकता. सध्या मार्केट मध्ये खूप ब्रोकर्स आहेत जे तुम्हाला ट्रेडिंग अकाऊंट ओपेन करून देतात तुम्ही योग्य तो ब्रोकर निवडून त्यांच्या कडून ट्रेडिंग अकाऊंट ओपेन करू शकता. ट्रेडिंग अकाऊंट ओपेन झाल्यावर तुम्हाला कुठल्या शेअर मध्ये गुंतूवणूक करायची आहे ते ठरवावे लागेल आणि त्या कंपनीचे शेअर विकत घ्यावे लागतील परंतु जो पर्यन्त तुम्ही शेअर मार्केट बद्दल संपूर्ण माहिती शिकत नाही तो पर्यन्त गुंतूवणूक करू नका. कारण माहिती नसेल तर शेअर मार्केट मध्ये गुंतूवणूक करणे नुकसान कारक ठरू शकते.

Why Invest in Share Market?

शेअर मार्केट मध्ये गुंतूवणूक का करावी? या प्रश्नाचे सोपी उत्तर म्हणजे दीर्घकाळासाठी आपल्या संपत्ति मध्ये काही प्रमाणात वाढ करण्यासाठी आपण शेअर मार्केट मध्ये इन्वेस्ट करतो. प्रत्येकाला वाटते की आपल्या Income चे sources वाढावे आणि त्यासाठी शेअर मार्केट हा एक योग्य मार्ग असू शकतो. योग्य शेअर मध्ये गुंतूवणूक केली तर झटपट नफा देखील आपल्याला मिळू शकतो.

Share Market Tips in Marathi

शेअर मार्केट मध्ये गुंतूवणूक करण्याआधी खालील काही महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवा

गुंतवणूक करण्यापूर्वी ध्येय निश्चित करा.

शेअर बाजाराच्या मूलभूत गोष्टी समजून घ्या.

संशोधन आणि योग्य परिश्रम करा.

मूलभूतपणे मजबूत कंपन्या निवडा.

अफवांवर आधारित खरेदी करू नका.

नफ्याची उद्दिष्टे परिभाषित करा.

विश्वासार्ह मध्यस्थांमार्फत गुंतवणूक करा.

धोकादायक कमी किमतीचे स्टॉक टाळा.

तुमची जोखीम सहनशीलता समजून घ्या.

तुमच्या गुंतवणुकीत विविधता आणा.

आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा.

नेहमी स्टॉप लॉस वापरा.

Set Goal Before Investing

ध्येय-आधारित गुंतवणूक तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कार्य करण्यास मदत करू शकते. तुमच्या आर्थिक गरजांचे मूल्यांकन करा आणि त्यानुसार तुमची अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करा. हे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी, लक्ष्य रक्कम आणि तुमच्या गरजांसाठी सर्वात योग्य गुंतवणुकीचा मार्ग ओळखण्यात मदत करेल.  तुम्हाला जर कमी कालावधी साठी गुंतूवणूक कराची असेल तर मग तुम्ही स्टॉकच्या किमतीतील अल्पकालीन चढउतारांपासून फायदा मिळवण्याचा प्रयत्न करू शकता. दुसरीकडे, तुमच्याकडे जास्त कालावधी असल्‍यास, तुम्ही ब्लू-चिप समभागांमध्ये गुंतवणूक करू शकता, कारण ते दीर्घकाळात चांगले परतावा मिळवून देण्यासाठी ओळखले जातात.

Undarstand Besics

तुम्ही तुमचे कष्टाने कमावलेले पैसे शेअर बाजारात गुंतवण्यापूर्वी, मूलभूत गोष्टी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे, जसे की – स्टॉक मार्केट कसे कार्य करते, बाजार कशावर चालतो, शेअरच्या किमती, व्यापार आणि गुंतवणूक धोरणांवर काय परिणाम होतो आणि बरेच काही जाणून घ्या. माहितीपूर्ण गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला अनेक तांत्रिक तज्ञांशी परिचित होणे देखील आवश्यक आहे. मूलभूत गोष्टी समजून न घेता गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार त्यांचे पैसे गमावू शकतात. तुम्हाला चांगले आणि सातत्यपूर्ण परतावा हवे असल्यास, शेअर बाजाराचा प्रवास सुरू करण्यापूर्वी शेअर मार्केट बद्दल आधी जाणून घ्या.

Research

शेअर मार्केट मध्ये कोणत्या स्टॉक मध्ये इन्वेस्ट करायचे आहे म्हणजे को कोणता स्टॉक विकत घ्यायचा आहे हे ठरवण्याआधी जो स्टॉक तुम्हाला विकत घ्यायचा आहे किंवा ज्या स्टॉक मध्ये तुम्हाला गुंतूवणूक करायची आहे त्या बद्दल आधी संपूर्ण माहिती मिळवा, जसे की ती कंपनी कशी आहे, कंपनी चे Incom Sources, Company Profile, भूतकालात कंपनीचे झालले नुकसान किंवा फायदा. या सर्व गोष्टी गुंतूवणुकी आधी माहीत असणे आवश्यक आहे.

SELECT FUNDAMENTALLY STRONG COMPANIES

Fundamentally Strong असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करावा. अशा कंपन्या दीर्घकाळात केवळ वर्धित परतावा देत नाहीत तर गुंतवणूकदारांना अधिक तरलता देखील प्रदान करतात. मूलभूतपणे मजबूत कंपन्यांमध्ये शेअर बाजारातील अस्थिरता आणि चढउतारांना तोंड देण्याची क्षमता असते. अशा प्रकारे, ते गुंतवणुकीसाठी तुलनेने सुरक्षित मार्ग आहेत.

Dont Trust on RUMOURS

शेअर मार्केट मध्ये बर्‍याचदा अफवा येत राहतात की हा स्टॉक घ्या, तो स्टॉक घ्या कमी वेळेत फायदा होईल, परंतु तुम्ही कधीही अश्या अफवांवर विश्वास ठेवू नका आधी Research करा Analyasis करा आणि नंतरच गुंतूवणूक करा.

DEFINE PROFIT TARGETS

शेअर बाजार अप्रत्याशित आणि अस्थिर असल्याने, कोणीही बाजाराच्या हालचालींना योग्यरित्या वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे, एखाद्या विशिष्ट स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या निर्गमन किंमती निश्चित करा असा सल्ला दिला जातो. एकदा तुमचे नफ्याचे लक्ष्य गाठले की, तुमची पोझिशन्स बंद करा आणि नफा बुक करा. लोभी असणे आणि जास्त परताव्याची वाट पाहणे ही अनेकदा वाईट कल्पना असते. शेअरची किंमत कधीही तुमच्या विरोधात जाऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला नुकसान देखील होऊ शकते.

AVOID RISKY LOW-PRICED STOCKS

ज्या शेअर ची किंमत कमी असते ज्याला आपण Penny Stocks म्हणतो अश्या कंपन्यांना नेहमी Avoid करा, कारण बर्‍याचदा अश्या व्यवहारमध्ये आपल्याला नुकसान होते.

Share Market Information in Marathi

मित्रांनो, पूर्वीच्या काळात शेअर मार्केट म्हटलं की लोकांना खूप काही विशेष वाटत होत आणि रिस्क पण वाटत होती परंतु सध्या डिजिटल युग आहे बर्‍याच गोष्टी ऑनलाइन शिकल्या जातात, यूट्यूब वर किंवा बरेचसे ब्रोकर आहेत ते शेअर मार्केट चे ऑनलाइन क्लास सुद्धा घेतात. शेअर मार्केट मध्ये गुंतूवणूक करण्याआधी संपूर्ण नॉलेज असणे आवश्यक आहे नाहीतर नुकसान देखील होऊ शकते.

मित्रांनो, शेअर मार्केट बद्दल A to Z (Share Market Information in Marathi) माहिती तुम्हाला आवडली असेलच तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, आणि जर तुमच्या मनात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेन्ट टाकून विचारू शकता.

शेअर करा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.