शेअर करा

नमस्कार मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाबद्दल संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या पोस्ट मधून सांगणार आहोत, तरी विनंती आहे की तुम्हाला जर सत्य शोधक समाजा बद्दल माहिती हवी असेल तर आमची ही पोस्ट शेवट पर्यंत वाचावी.

दिनांक २४ सप्टेंबर १८७३ रोजी म.ज्योतीबा फुले यांनी पुण्यामध्ये ‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना केली, सत्य शोधक समाजाचे ब्रीदवाक्य हे सर्वसाक्षी जगत्पत्ती त्याला नकोची मध्यस्ती होते.

सत्य शोधक समाजाचा उद्देश

शूद्रातिशूद्रांची स्थिती सुधारण्यासाठी धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करणे. हा सत्य शोधक समजाच्या स्थापणे मागचा मुख्य उद्देश होता.

१८७३-१८९० पुणे-मुंबई भागात सत्य शोधक समाजाची चळवळ विस्तार पावली. १८९०- १९१० या काळात विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात चळवळीचे लोण पोहोचले. १९१०- १९१९ – या काळात सत्यशोधक चळवळीचे ब्राह्मणेतर चळवळीत व पक्षात रुपांतर झाले व त्याला राजकीय स्वरूप प्राप्त झाले. १९१९-१९३८ या काळात सत्यशोधक चळवळीचे ब्राह्मणेतर चळवळीत व पक्षात रूपांतर झाले व त्याला राजकीय स्वरूप प्राप्त झाले.

सत्य शोधक समजाची तत्त्वे

 • ईश्वर निर्गुण निराकार आहे.ईश्वर एकच आहे व तो सत्य स्वरूप आहे.
 • मनुष्य जातीने श्रेष्ठ नसुन गुणाने श्रेष्ठ ठरतो.
 • कोणताही धर्मग्रंथ प्रमाण व ईश्वरनिर्मित नाही.
 • परमेश्वर अवतार घेत नाही.
 • आई वडिलांना प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्ती लागत नाही. त्याचप्रमाणे देवाची प्रार्थना करण्यास पुरोहीत किंवा गुरु लागत नाही.

सत्य शोधक समाजाचे स्वरुप

 • सत्यशोधक समाजाचे सभासदत्व हे सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी खुले होते.पुणे-नाशिक-ठाणे-सासवड- अहमदनगर-निपानी बेळगांव-अडगाव-जळगाव- अकोला-इंदापूर येथे शाखा स्थापन झाला.
 • कोल्हापूर व सातारा हे समाजाचे बालेकिल्ले.
 • सदस्य होताना पुढील शपथ घ्यावी लागे – “सर्व मानव एकाच देवाची लेकरे आहेत. ती सर्व माझे भावंडे आहेत. अशाबुद्धीने मी त्यांच्याशी बागेन, धार्मिक विधीच्या वेळी मी मध्यस्त ठेवणार नाही. व मी माझ्या मुलामुलींना सुशिक्षीत करेन.
 • आपण इंग्रजी सत्तेशी एकनिष्ठ राहू असे एक वाक्य शपथेमध्ये होते.
 • सत्यशोधक समाजात राजकीय विषयांवर बोलणे वर्ज्य होते.
 • सदस्य होण्यासाठी ‘बेल भंडारा’ उचलणे व कबीरांच्या विमतीचे वाचन करणे ही अट होती.
 • दर ‘रविवारी’ समाजाची बैठक ‘भाऊ मनसाराम यांच्या घरी भरत असे.
 • म. फुले यांचा सत्यशोधक समाज हा मानवता बुद्धिप्रामाण्य व्यक्तिस्वातंत्र्य या प्रमुख तत्वांवर आधारित होता
 • सत्यशोधक समाज चळवळ ही एका विशित समाज व धर्माचे नेतृत्व करणारी चळवळ नसुन ती सर्वसामान्य अस्य समाजाची एक कार्यप्रवण चळवळ होती. ब्राह्मण असे जरी पातकी तरी तो वंश असे तिन्ही जगती या धोरणाला सत्यशोधक समाजाने विरोध केला.
 • सत्यशोधक समाजाच्या कार्यकत्यांनी ‘गंजपेठेत’ ‘सावतामाळी फ्री बोर्डिंग’ स्थापना केली.
 • १ जाने. १८७७ रोजी म. फुलेंच्या प्रेरणेने ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक ‘कृष्णराव पांडुरंग भालेकर यांनी सुरु केले. (१८८० पासून ना.म. लोखडे यांनी दीनबंधूचे व्यवस्थापन पाहिले) (दीनबंधू हे भारतातील कामगारांसाठीचे पहिले वृत्तपत्र होय)
 • १८८५ साली भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेत ज्योतीबांच्या मंगलअष्टकात काही सुधारणा करण्यात आल्या.
 • सत्यशोधक समाजाचे कार्य ‘दीनबंधू’ मधून प्रसिद्ध केले जात असे. • १८८८ साली समाजाने पुण्यात आपल्या झेंड्याखाली मोठी मिरवणूक काढली.
 • सत्यशोधक समाजाची पहिली शाळा ‘भिलारे मंडळीं’नी ‘भिलार’ ला स्थापन केली.
 • १८७५ साली सत्यशोधक समाजाचे ३१६ सदस्य होते.
 • बहुसंख्य वृत्तपत्रे ब्राह्मणांसारख्या उच्चवर्णीयांच्या मालकीची असताना सत्यशोधकांनी व त्यांच्या पाठीराख्यांनी ‘दीनमित्र’ सारखे मासिक व बडोदावत्सल’-‘राघवभूषण’- अंबालहरी’ व ‘शेतकऱ्यांचा कैवारी ही वृत्तपत्रे चालवली. • १९ व्या शतकात तेलंगणातून आलेल्या तेलगू फूलमाळू समाजाचे ‘रामय्या व्यंकय्या अय्यावारू’ व ‘व्यंकू बाळोजी काळेवार’ यांनी सत्यशोधक समाजाला वृत्तपत्र व पुस्तके काढण्यास पैसा पुरविला.
 • १८९० ते १९१० या काळात सत्यशोधक समाजाची चळवळ थंडावली होती.

ज्योतीबांनी पुरोहिताविना लग्न व्हावीत म्हणून मराठीत मंगलाष्टके रचली. ही मंगलाष्टके वधूवरांना स्वतः म्हणावयाची होती. सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने झालेले पहिले तीन विवाह पुढीलप्रमाणे –

 • २५ डिसें. १८७३-सिताराम अल्हार व राधाबाई निमकर यांचा
 • ज्ञानोबा ससाणे व काशिबाई शिंदे
 • ओतूर गावी (शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या बाळाजी पाटील डुंबरे यांनी त्यांच्या मुलाचा विवाह या पद्धतीने केला.

सत्य शोधक समाज परिषद

 • पुणे १७ एप्रिल १९१९ (रामय्या अय्याचार व संतु रामजी लाड यांनी) (२) नाशिक- एप्रिल १९१२. न १८९३ साली सासवड येथे झालेल्या ‘सत्य शोधक समाजाच्या’ परिषदेचे अध्यक्ष स्थान सावित्रीबाई फुलेंनी भूषविले.
 • सत्यशोधक समाजाशी संबंधित व्यक्ती – १). कृष्णराव भालेकर ‘दीनबंधू सार्वजनिक सभा स्थापन दीनबंधू वृत्तपत्र चालविले, शेतकरी हा सत्यशोधक समाजाचा कणा आहे म्हणून शेतीविषयक प्रश्नात लक्ष घातले. २). विश्राम पोले- १८७५ ते ७७ या कालावधीत सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते. ३. संतुजी रामचंद्र लाड- दीनबंधू वृत्तपत्रास आर्थिक मदत केली. ४. ना.म. लोखंडे, पं. नामदेव कुंभार, रामय्य अय्यावारू, व्यंकु काळेवार, बिजें, यशवत फुले, हरिरावजी चिपळूणकर, ताराबाई

शेअर करा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.