खमंग पुरण पोळीची रेसीपी | Puran Poli Recipe in Marathi

Puran Poli Recipe in Marathi: कोणताही सन आला की घरी वेगवेगळ्या खाद्य पदार्थांची मेजवानी असते. असाच एक महाराष्ट्रातील पारंपरिक खाद्य पदार्थ म्हणजे पुरण पोळी होय. हा शब्द ऐकलाकी लगेच तोंडाला पाणी सुटते. या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला Puralpoli ची संपूर्ण Recipe in Marathi मध्ये सांगणार आहोत. तुम्हाला जर तुमच्या घरी खमंग अशी Puran Poli बनवायची असेल तर विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यंत वाचावी.

Puran Poli Recipe in Marathi

एखादा सन असला किंवा घरी पाहुणे आली की पुरण पोळीचा मस्त बेत असतो. Puran Poli बनवायची Recipe एकदमच सोप्पी आहे आणि Puran poli ला महाराष्ट्रात्च नव्हे तर संपूर्ण देशात ओळखले आणि बनविल्या जाते. आता तर बरेच वेळा आपण यूट्यूब वर पाहतो की विदेशी लोक सुद्धा पुरण पोळी बनवितात. होळी, दिवाळी, दसरा सारखे सन आले की आपल्या घरी पुरण पोळी बनविल्या जाते आणि मग त्यावर मस्त पैकी तूप टाकून खाल्ले की मग तो विषयच भारी असतो!

Puranpoli बनविण्यासाठी साधारण: 40 मिनिटे ते 1 तास लागतो आम्ही खाली स्टेप बाय स्टेप सांगणारच आहोत की पुरण पोळी सोप्प्या पद्धतीने कशी बनवायची.

सर्वात आधी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पुरण पोळी बनवण्यासाठी कोणती सामग्री लागणार आहे.

Puran Poli Ingredients/सामग्री

 • एक कप हरभर्‍याची डाळ
 • ¼ टी स्पून हळद
 • ¼ टी स्पून मीठ
 • 3 कप पाणी
 • 1 टी स्पून तेल
 • 1 कप गूढ
 • ¼ टी स्पून जायफळाची पावडर
 • ¼ टी स्पून इलाईची पावडर
 • 2 कप गव्हाचा आटा
 • ½ कप मैदा

Puranpoli Recipe in Marathi

 • सर्वात आधी एका मोठ्या पातेल्यात 1 कप हरभर्‍याची डाळ घ्या आणि त्यात आवश्यक असेल तेवढे पाणी टाकून 3 तासासाठी पाण्यात भिजत ठेवा.
 • आता प्रेशर कुकरमध्ये कुकरच्या तळाशी पाणी टाकून त्यावर भांडे ठेवा.
 • आणि त्या भांड्यात भिजत घातलेली हरभर्‍याच्या डाळी मध्ये ¼ टीस्पून हळद, ¼ टीस्पून मीठ, 3 कप पाणी आणि 1 टीस्पून तेल घाला.
 • कुकरच्या 3-4 सिट्या होऊ द्या. गॅस जास्त वाढवू नका.
 • कुकरच्या 3 ते 4 सिट्या झाल्या की कुकरचे झाकण उघडा. आणि 10-15 मिनिट ते तसेच ठेवा.
 • नंतर डाळीत शिल्लक राहिलेले पाणी बाहेर काढा.
 • शिजलेली चणाडाळ कढईत ठेवा आणि त्यात १ वाटी गूळ घाला.
 • गूळ वितळेपर्यंत चांगले मिसळा.
 • चणाडाळ मॅश करा आणि ढवळत राहा.
 • जेव्हा मिश्रण घट्ट होईल तेव्हा गॅस बंद करा.
 • मिश्रण थोडे थंड होऊ द्या आणि मग त्याला मिक्सर च्या भांड्यात घाला.
 • आणि सोबतच ¼ टीस्पून जायफळाची पावडर आणि ¼ टीस्पून इलाईची पावडर त्यात टाका.
 • या मिश्रणात कोणतेही पाणी न घालता गुळगुळीत होई पर्यंत मिक्सर मध्ये मिसळा.
 • आता एका मोठ्या भांड्यात चाळणी ठेवा, मिश्रण गाळून घ्या.

How to Make Puran poli

वरील प्रकारे मिश्रण तयार झाल्यावर तुम्हाला त्यात गव्हाचा आटा घालावा लागेल.

 • एका भांड्यात 2 कप गव्हाचा आटा, ½ कप मैदा, ¼ टीस्पून हळद, ¼ टीस्पून मीठ घ्या. आणि हे सर्व मिक्स करा.
 • सर्वकाही चांगले एकत्र केले आहे याची खात्री करून हे मिश्रण चांगले मिसळा.
 • आता आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ चांगले मळून घ्या.
 • त्यात १ चमचा तेल घाला आणि पीठ मळत राहा.
 • पीठ मऊ होई पर्यंत मळत रहा.
 • पीठ मऊ झाल्यावर त्यावर झाकण ठेऊन 10-15 मिनिटे तसेच ठेवा.

पोळ्या कश्या लटायच्या

 • तयार झालेल्या पिठाचा थोडा तुकडा तोडा आणि त्याला चपटे करा.
 • त्यात मध्यभागी तयार केलेले पुरण भरा.
 • पुरण भरून घ्या आणि जास्तीचे पीठ घट्ट बंद करा.
 • नंतर त्याची पोळी लाटा.
 • गॅस वर तवा ठेवा आणि त्यावर लाटलेली पोळी टाका.
 • तव्यावर पोळी चांगल्या प्रकारे होऊ द्या.
 • पोळी पलटतांना त्यावर थोडे तूप/तेल टाका म्हणजे पोळी लसलसित होईल.
 • Puran Poli तयार झाल्यावर त्यावर तेल किंवा तूप टाकून Serve करा.

मित्रांनो, Puran Poli Recipe in Marathi तुम्हाला नक्कीच आवडली असेल. PuranPoli कशी बनवायची? या बद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कमेन्ट टाकून आम्हाला नक्की विचारा.

Leave a comment