शेअर करा

पुणे सार्वजनिक सभेची स्थापना हि  २ एप्रिल १८७० रोजी सार्वजनिक काका म्हणून ओळख असलेले  गणेश वासुदेव जोशी यांनी केली. मुंबई प्रांतातील ‘सनदशिररित्या चळवळ करणारी सार्वजनिक सभा हि पहिली संघटना होती. सार्वजनिक सभेचे संस्थापक हे गणेश वासुदेव जोशी होते परंतु या संस्थेच्या स्थापनेत सदाशिव गोवंडे, शिवराम साठे व शांताराम चिपळूणकर यांचा सुद्धा सहभाग होता. पुणे सार्वजनिक सभेचे बहुसंख्य सभासद हे ब्राम्हण धर्मीय होते. सरदार इनामदार- सावकार व्यापारी यांचा पण सहभाग होता. सभेची सर्व सुत्रे वकील मंडळीकडे होती.

प्रत्येक सभासदाला किमान ५० प्रौढ व्यक्ति मुखत्यारनामा लिहून दिलेला असे. अध्यक्ष श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी (औध) ६ उपाध्यक्ष व ५ चिटणीस होते. व्यवस्थापक मंडळात ४ व्यक्ती, कार्यकारी मंडळात सर्वधर्माची लोक होती. सभेचे निर्णय बहुमताने होत. सदस्यत्वासाठी प्रतिज्ञा पत्रक व शपथ आवश्यक सभेने दिलेली कामे भेदभाव न करता निस्पृहपणे करीन अशी शपथ घ्यावी लागे.

सार्वजनिक सभेचा विस्तार

पुण्यातील पर्वतीच्या संस्थानचा गैरकारभार, भ्रष्टाचार, अरेरावी दुर करणे व त्यावरती उपाययोजनेसाठी सार्वजनिक सभेची स्थापना झाली. सभेचा उद्देश सुरुवातीला पर्वती संस्थानापूरताच मर्यादीत पण नंतर विस्तार वाढला. १८७१ ला न्या. रानडे न्यायाधिश म्हणून आल्यानंतर तेच पदड्यामागून सभेची सुत्रे चालवत (पण ते सरकारी नोकर असल्याने सभेचे सभासद झाले नाहीत.) १८८० ला ग.वा. जोशी व त्यानंतर सीताराम चिपळूणकर, शिवराम साठे, गो. कृ. गोखले, लोकमान्य टिळक यांनी सभेचा कार्यभार पाहिला.

सार्वजनिक सभेचे कार्य

सार्वजनिक सभेचे राजकारण हे अर्ज आणि विनंत्याचे होते. दारूचे गुत्ते कमी करणे हे सार्वजनिक सभेची मुख्य मागणी होती. आणि बऱ्या पैकी पुण्याच्या काही भागात त्यांनी दारू बंदी सुद्धा केली आणि लोकांचा सुद्धा या मध्ये सहभाग होता. तसेच कायदा मसुदे मराठीत उपलब्ध करणे हि सुद्धा सार्वजनिक सभेची मागणी होती. मुंबई हायकोर्टात किमान १ न्यायाधीश मराठी असावा, सोनियुक्त प्रतिनिधी घ्यावेत, पुण्याच्या प्रश्नासाठी पालीकेकडे अर्ज करणे, सरकारी अधिकान्यांची भेट घेऊन प्रश्न सोडविणे इत्यादी महत्वाचे कार्य सार्वजनिक सभेने केले.

सौराष्ट्र म्हणजे गुजरात मध्ये १८७३ ला शेतकरी आर्थिक स्थितीची पाहणी सार्वजनिक सभेच्या माध्यमातून केल्या गेली. तकन्यांची स्थिती वाईट असताना सभेने अर्ज करून महसुलवाढ अन्यायकारक असल्याचा इशारा दिला. सरकारने लावलेल्या मिठाच्या कराविरोधात जनमत संघटीत करण्याचा प्रयत्न केला. १८७४ ला गिरणा व पांझरा नदीला पुर आला असता सभेचे पुरग्रस्तांना ३००० रु मदत पाठविली. बॉम्बे असोसिएशन २५०० रु. मदत केली. (पार्लमेंटच्या फायनान्स कमिटीपुढे साक्ष देण्यासाठी फटुनजी ची निवड झाली त्यावेळी सभेने मदत केली. शेतकरीचे सावकारांविरोधात बंड व सभा

१८७५ ला सातारा – पुणे-नगर-नाशिक-खानदेश- सोलापूर सावकारांविरोधात बंड झाले.  हेच बंड ‘दख्खन दंगे नावाने प्रसिद्ध आहे. पुणे सुपे येथे या बंडाची सुरुवात झाली होती. सभेने बडाची पाहणी करून त्याची जबाबदारी सरकारवर टाकून सरकारने शेतकऱ्यांना कर्ज शेतीस बंधी शिक्षण देण्याची शिफारस केली. परिणामी सरकारने डेक्कन अॅग्रीकल्चर रिलीफ अॅक्ट १८७९ पास केला. दुष्काळग्रस्तांना मदत (१८७६-७७)  ग. वा. जोशींच्या नेतृत्वात सभेने पाहणी करून एक अर्ज सरकारला सादर केला, जोशींनी बंगाल-गुजरात-मद्रास येथून ७०,०००/- रु. चा निधी उभारून शेतकऱ्यांना मदत दिली. दुष्काळ समिती नेमण्यासाठी सभेचा आग्रह त्यानुसार सरकारने दुष्काळ संहिता तयार करुन त्याच्या ६००० प्रती मोफत वाटल्या. सभेने सरकारने नेमलेल्या दुष्काळ समितीचे अध्यक्ष केर्ड होते. (समिती समोर जोशींची साक्ष) १८७७ ला लिटन यांनी राणी व्हिक्टोरियाला भारताची सम्राज्ञी किताब देण्यासाठी भरवलेल्या दरबारात ‘ग.वा. जोशी’ यांनी सभेतर्फे राणीला मानपत्र सादर करून त्यात मागण्या केल्या. त्यावेळी ते खादी पोशाखात हजर होते. सभेच्या माध्यमातून रानडे व ग.वा. जोशी यांनी स्वदेशीचा प्रसार केला. दोघांनीही देशोन्नतीसाठी स्थानिक उद्योगावर भर दिला. [सार्वजनिक काकांच्या पत्नी ‘सरस्वतीबाईनी’ पुण्यात स्त्री विचारवती‘ ही सामाजिक संस्था स्थापली)

संस्थेने १८७८ ला स्त्रीबांसाठी (सर्व जातीच्या) ‘हळदी कुंकवाचा’ कार्यक्रम घेतला. जोशी यांनी मेणबत्ती काडीपेटी- छत्र्या इ. चा कारखाना सुरु केला. देशी हातमाग व स्वदेशी दुकानांच्या उत्तेजनासाठी ‘देशी व्यापारोत्तेजक संस्था स्थापली. सभेने मुद्रण स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. मुंबईतील सर्व वृत्तपत्रांनी लिटनच्या भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा १८७८ चा निषेध केला. राव बहादुर सदाशिव गोवडे व ‘ग. वा. जोशीं’नी कलकत्ता व मुंबईत सभा घेऊन या कायदयाचा निषेध केला. सभेने १८७८ पासून ‘कार्टल जर्नल ऑफ द पूना सार्वजनिक सभा’ हे मराठी-इंग्रजी त्रैमासिक’ सुरु केले. जुलै १८७८ ला त्याचा प्रथम अक निघाला. त्यात संपादक ‘सिताराम हरी चिपळूणकर’ यांनी सभेची उद्दीष्टे विषद केली. (दक्षिण महाराष्ट्र कार्यक्षेत्रातील प्रजेचे प्रश्न सरकारकडे सादर करणे हा सभेचा उद्देश) त्यात रानडे-आकडेशग व्यं. जोशी न्या. तेलंग यांचे लेख प्रसिद्ध होत. ● ‘दिनबंधू’ चे संपादक ‘कृष्णराव भालेकरांनी ग.वा. जोशींना ग्रंथालय काहण्यास सहकार्य केले.

ग बा जोशीच्या पत्नी सरस्वतीबाई व सदाशिव गोवडे यांच्या पत्नी सरस्वतीबाई (सदाशिव पण सरस्वती होते) यांनी पुण्यात स्त्रियांना एकत्र आणण्यासाठी ‘स्त्री विचारवती सभा’ स्थापली. सभेने ब्रिटीश पार्लमेंटमध्ये भारतीय सभासद असावेत अशी मागणी केली . १८७९ साली ‘विश्रामबाग बाड्याला आग लागली असता ती विझवण्यासाठी व पुर्नबांधणीसाठी ग.वा.जोशीनी सहभाग घेतला. ग.वा. जोशी यांनी वासुदेव बळवंत फडके यांचे वकिलपत्र घेतले. १८९६ ला महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला असता त्याचवर्षी सभेने शेतकन्यांच्या ‘साराबंदी’ चळवळीसाठी प्रयत्न केले. १८९१ ते ९६ काळात गो. कु.गोखले हे या सभेचे सचिव होते. टिळकांनी या सभेच्या माध्यमातून १८९६ ला दुष्काळी भागात ‘खंडबंदी चळवळ’ सुरु केली. त्यात अच्यूतराव साठे -दत्तोपत आपटे परांजपे, करुळकर, पिपुरकर यांवर सरकारने खटले भरले. ● सार्वजनिक सभा टिळकांच्या ताब्यात गेल्यावर मुळच्या सभेतील कार्यकर्त्यांनी पुण्यात ‘डेक्कन सभा स्थापली. १८९७ ला मुंबई सरकारने सार्वजनिक सभेचे स्वरूप अर्ज विनंती करणारी संस्था न राहिल्याने (टिळक काळात) सभेची मान्यता रद्द केली.

सभेने पुढीलबाबतीत सरकारला सल्ला दिला – फौ. खटल्यात ज्युरी पद्धती. न.पालीक सदस्य नेमणूका, संस्थानिकाचे अधिकार, राज्यातील दंगे , रेल्वे प्रश्नाच्या अडचणी, बडोदा राजे मल्हारराव गायकवाड यांवर १८७५ ला तेथील रेसीडटवर विषप्रयोग केल्याचा आरोप करण्यात आला – त्यावेळी त्यांना कायदेशीर व आर्थिक मदत करण्याची चळवळ सभेने घेतली. सार्व. सभेचे सर्व सभासद ब्राह्मण होते. सभेने कनिष्ठ वर्गाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे म. फुलेंनी सभेला ‘सार्वजनिक भटसभा’ म्हटले कारण त्यावर उच्चवर्णीयांचाच प्रभाव • त्यामुळेच कृष्णराव भालेकर यांनी ‘दिनबंधू सार्वजनिक सभा’ स्थापन केली.

ग.वा. जोशीच्या मृत्युनंतर त्याच्या स्मारकासाठी वर्गणी गोळा केली (फुलेंनी वर्गणी दिली) अॅनल ह्युम यांनी राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाची जबाबदारी सार्वजनिक सभेवर टाकली होती. (जे सुरुवातीला पुण्यात होणार होते)

शेअर करा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.