शेअर करा

केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांच्या जन्म: १० सप्टें. १८८५ मध्ये पनवेल’ येथे झाला. प्रबोधनकारांचे पूर्णनाव केशव सिताराम ठाकरे तसेच प्रबोधनकरांचे म. ज्यो फुले’ हे आदर्श होते. सुरुवातीच्या काही काळात प्रबोधनकार हे पुण्यात वास्तव्यास होते. सामाजिक सुधारणा हेच त्यांचे जीवनाचे ध्येय होते. समाजातील बालविवाह, विधवा केशवपन, ब्राह्मण पूजान्यांची अरेरावी, हुंडाप्रथा तसेच अस्पृश्यता अशा सर्व प्रथम त्यांनी टिका केली, त्याला विरोध केला. त्यासाठी त्यांनी वत्कृत्व, लेखन, प्रत्यक्षकृती या तीन शास्त्रांनी पुराणमतवाद्याशी लढा दिला. समाजातील सर्व विकारांचे मर्म ब्राह्मणी कर्मकांडात आहे असे त्यांचे मत होते.

पुरोगामी-उदारमतवादी-सुधारक विचारांच्या ब्राह्मणांविषयी त्यांच्या मनात द्वेषभावना नव्हती पण ते धंदेवाईक ५२ भिक्षुकांचे टीकाकार होते. संत एकनाथांच्या जीवनावरील ‘खरा ब्राह्मण’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या ब्राह्मणांची नंतरच्या काळात ते शाहू महाराजांच्या संपर्कात आले. शाहूनी त्यांची परिक्षा घेतली व नंतर जाहीरपणे सांगितले की, लाच देऊनही ज्याला वश करता येणार नाही अशी भूमिका मांडली. घेता येणार नाही अशी एकच व्यक्ती मी पाहिली आहे ती म्हणजे प्रबोधनकार होय. प्रबोधनकार हे लेखक, इतिहासकार, पत्रकार होते. मुंबईत स्थायीक झाल्यानंतर प्रबोधनकारांनी हुंडाप्रतिबंधक चळवळ हाती घेतली व सर्व जातींची ‘हुडाप्रतिबंधक स्वयंसेवक सेना’ स्थापन करून अनेक वरपित्यांना त्यांनी घेतलेला हुंडा परत करण्यास भाग पाडले. त्यांनी अनेक प्रेमी युगुलांचे विवाह लावून दिले.

प्रबोधनकारांनी ‘सारथी’ ‘लोकहितवादी’ व ‘प्रबोधन’ या नियतकालीकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. वयाच्या शेवटच्या काळातही त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेवून चळवळीला सहाय्य दिले. त्यातही त्यांनी काही काळ तुरुंगवास देखील भोगला.

प्रबोधनकरांचे वाङ्मय

नाटक खरा ब्राह्मण टाकलेलं पोर, संगीत सीताशुद्धी-संगित विधिनिषेध वैचारिक देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे देवांची परिषद, दगलबाज, शनिमहात्म्य, शेतकन्यांचे स्वराज्य इतिहास संशोधन कोदंडाचा टणाकार, ग्रामस्थांचा सादयंत इतिहास, भिक्षुकाचेही बंद, प्रतापसिंह छत्रपती

चरित्र – संत गाडगेबाबा रंगा बापूजी, पं. रमाबाई सरस्वती. आत्मचरित्र – ‘माझी जीवनगाया’

“इतर:

  • उठ मराठ्या उठ (लेख संग्रह)
  • अल्या आठवणी (ललित)
  • बक्तृत्वशास्त्र (माहितीपट)
  • हिंदु धर्माचा -हास आणि अधःपात (अनुग्रह)

ठाकरेंच्या ‘खरा ब्राह्मण नाटकाला परवानगी देवु नये अशी मागणी पुण्यातील ब्राह्मणांनी न्यायालयाकडे केली असता न्यायाधिशांनी प्रबोधनकारांच्या बाजूने निर्णय दिला. शिवसेना प्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे त्यांचे पुत्र आहेत.

केशव सीताराम ठाकरे यांचा मृत्यू: २० नोव्हेंबर १९७३ रोजी मुंबई येथे झाला.

शेअर करा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.