शेअर करा

तुम्ही तुमच्या घरी कधीतरी जवसाच्या (Flax Seeds in Marathi) बिया वापरल्या असतीलच. जवसाचा वापर अनेक घरगुती पदार्थांमध्ये केला जातो. जवसाच्या बिया ह्या खूप लहान परंतु ह्याचे एवढे फायदे आहेत की आपण अंदाज लावू शकत नाही. आपण घरी बरेचदा जवसाच्या बियांचा वापर हा घरगुती खाद्यपदार्थांनामध्ये करतो, परंतु याचा वापर हा येवढ्या पर्यन्तच सीमित नाही. या पोस्ट च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला Flax Seeds म्हणजे जवसाच्या बियांचा वापर आणखी कुठे केला जातो ते सांगणार आहोत, तसेच जवसाच्या बियांचा आपल्या शरीराला काय फायदा होतो किंवा नुकसान होते या सर्व गोष्टी सविस्तर सांगणार आहोत तरी विनंती आहे की तुम्हाला Flax Seeds in Marathi जाणून घ्यायचे असेल तर आम्ही ही पोस्ट शेवट पर्यंत वाचावी.

Flax Seeds in Marathi

Flax Seeds चा वापर हा खाण्याच्या पदार्थांमध्ये तर होतोच शिवाय फ्लेक्ससीड वापरून तुम्ही अनेक रोग देखील टाळू शकता, तुमचे कुटुंब निरोगी बनवू शकता. अळशी हे गळीताचे धान्य आहे. आयुर्वेदामध्ये जवसाच्या बियांना खूप महत्व दिल्या जाते. जवसाचे दुसरे नाव टिसी आहे. ही एक औषधी वनस्पती आहे, जे औषध म्हणून देखील वापरली जाते. ठिकाणांच्या स्वरूपानुसार तिशीच्या बियांचा रंग, आकार आणि प्रकार यात फरक आढळून येतो. देशभरात, जवसाच्या बियांचा रंग हा कला, पांढरा आणि कुठे कुठे तर लाल देखील असतो. उष्ण प्रदेशातील तिशी म्हणजे जवस सर्वोत्तम मानले जाते. सामान्यतः लोक जवसाच्या बिया, तेल वापरतात. श्वास, घसा दुखणे, कफ, पचनसंस्थेचे विकार यासह जखमा, कुष्ठरोग इत्यादी आजारांमध्ये जवसाच्या बियांपासून खूप फायदा होऊ शकतो.

इतर भाषांमध्ये जवसाची नावे

वेगवेगळ्या भाषेमध्ये जवसाला वेगवेगळी नावे आहेत. जवसाला Latin भाषेमध्ये लाइनम यूसीटैटीसिमम असे म्हणतात तर हे लाइनेसी या वर्गात मोडते, जवसाची काही इतर भाषेतील नावे खाली दिली आहेत –

Flax seeds in Marathi जवस (Javas), अलशी (Alashi)
Flax seeds in Hindi तीसी, अलसी
Flax seeds in Urdu अलसी (Alasi)
Flax seeds in English लिनसीड (Linseed), फ्लैक्स प्लान्ट (Flax plant), कॉमन फ्लैक्स (Common flax)
Flax seeds in Sanskrut अतसी, नीलपुष्पी, नीलपुष्पिका, उमा, क्षुमा, मसरीना, पार्वती, क्षौमी
Flax seeds in Oria पेसू (Pesu)
Flax seeds in Kannada अगसीबीज (Agasebeej) सेमीअगासे (Semeagase), अलसी (Alashi)
Flax seeds in Kokani सोन्नबीअम (Sonnbiam)
Flax seeds in Gujarati अलसी (Alshi)
Flax seeds in Tamil अलिविराई (Alivirai), अलसीविराई (Alshivirai)

जवसाचे फायदे

Jawas खाण्याचे किंवा जवसाचे खूप फायदे (Flax Seeds Benefits in Marathi) आहेत त्यापैकि खाली काही महत्वाचे फायदे दिले आहेत –

निद्रानाशामध्ये जवसाचे फायदे

निद्रानाशाच्या आजारात जवसाचे सेवन फायदेशीर ठरते. यासाठी जवस आणि एरंडेल तेल समप्रमाणात एकत्र करून पितळेच्या ताटात चांगले बारीक करून घ्या. डोळ्यात काजळाप्रमाणे लावल्याने झोप चांगली लागते.

डोळ्यांच्या आजारात जवसाचे फायदे

फ्लॅक्ससीडचे गुणधर्म डोळ्यांच्या आजारांवर खूप फायदेशीर आहेत. डोळे येणे, डोळे लाल होणे इत्यादी डोळ्यांचे आजार बरे होण्यासाठी जवस पाण्यात भिजवावे. आणि हे पाणी डोळ्यात टाकले तर डोळ्यांच्या समस्येवर याचा फायदा होतो.

दुखणे आणि सुजणे

दुखणे आणि सूज यांवरही जवसाच्या बियांचा वापर खूप फायदेशीर आहे. यामध्ये जवसापासून बनवलेले ओले औषध खूप चांगले काम करते. 4 भाग उकळत्या पाण्यात एक भाग ठेचलेली जवस घाला आणि हळूहळू मिसळा. आणि हे मिश्रण ओले असले पाहिजे, परंतु जास्त जाड नको. दुखत असलेल्या किंवा सुजलेल्या भागावर तेलाप्रमाणे हलक्या हाताने लावा.

कानाची सूज

कानाला आलेली सूज दूर करण्यासाठी सुद्धा जवसाच्या बियांचा वापर केल्या जातो, त्यासाठी जवसाला कांद्याच्या रसात शिवजून त्याला गाळून  घ्या आणि या मिश्रणाचे 1 ते 2 थेंब कानात टाका कानाच्या दुखण्यावर बराचा आराम वाटेल.

डोकेदुखीवर जवसाचा उपचार

तुमचे जर डोके दुखत असेल तर यावर सुद्धा जवस खूप गुणकारी आहे. यासाठी फ्लॅक्ससीड्स थंड पाण्यात बारीक करून ते लावा. जळजळ, किंवा इतर प्रकारचे डोकेदुखी, किंवा डोक्याच्या जखमा, यावर हे फायदेशीर आहे.

जवसाची शेती कुठे केल्या जाते?

जवसाची ची लागवड संपूर्ण भारतात केली जाते. भारतात, जवसाची लागवड शरद ऋतूतील कापणीच्या वेळी केली जाते. हिमाचल प्रदेशातही जवसाची लागवड ही १८०० मीटर उंचीपर्यंत केली जाते.

मित्रांनो, आम्हाला आशा आहे की Flax Seeds in Marathi तसेच Flax Seeds Benefits in Marathi बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल, तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर नक्की आम्हाला कमेन्ट टाकून कळवा.

शेअर करा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.