शेअर करा

कोणत्याही प्रकारची मार्केटिंग जी करण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर करावा लागतो जसे की टीव्ही, इंटरनेट, सोशल मीडिया, इत्यादि यालाच Digital Marketing असे म्हणतात (Digital Marketing Meaning in Marathi). सध्या डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी सोशल मीडिया चा जास्त प्रमाणात वापर केल्या जातो कारण दिवसेंदिवस इंटरनेट वापरनार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. डिजिटल मार्केटिंग बद्दल थोडक्यात सांगायचे झाल्यास एखाद्या वस्तूची ऑनलाइन म्हणजे Facebook, Instagram, Twitter, इत्यादि वर जाहिरात करणे यालाच डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing in Marathi) असे म्हणता येईल. डिजिटल मार्केटिंग हा आपण समजतो तेव्हडा सोप्पा विषय नाही, कारण यासाठी खूप सार्‍या गोष्टींचे ज्ञान असावे लागते. तर मित्रांनो, आमच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला Digital Marketing बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत जसे की, डिजिटल मार्केटिंग काय आहे? (What is Digital Marketing in Marathi) डिजिटल मार्केटिंग चे प्रकार (Types of Digital Marketing in Marathi), डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी काय शिकावे लागते?, डिजिटल मार्केटिंग कश्या प्रकारे केल्या जाते?, तरी विनंती आहे की तुम्हाला जर Digital Marketing in Marathi जाणून घ्यायचे असेल तर आमचा हा लेख शेवट पर्यंत वाचावा.

Digital Marketing in Marathi

डिजिटल मार्केटिंगला आपण ऑनलाइन मार्केटिंग असे सुद्धा म्हणू शकतो, कारण डिजिटल मार्केटिंग ही ऑनलाइनच केल्या जाते. डिजिटल मार्केटिंग म्हणजे एखाद्या कंपनी चे, ब्रॅंड चे वेगवेगळ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर Promotion करणे होय. हे Online Promotion करण्यासाठी खूप सारे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत जसे की यूट्यूब, फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम, ईमेल, आणि आणखी सुद्धा बरेच प्लॅटफॉर्म आहेत ज्या वर आपण डिजिटल मार्केटिंग करू शकतो.

हे सुद्धा वाचा – शेअर मार्केट काय आहे?

Inbound Marketing आणि Digital Marketing

डिजिटल मार्केटिंग आणि इनबाउंड मार्केटिंग ह्या दोन्ही Dगोंधळात टाकणार्‍या गोष्टी आहेत.  डिजिटल मार्केटिंग मध्ये इनबाउंड मार्केटिंग सारखीच अनेक साधने वापरल्या जातात, जसे की—ईमेल आणि ऑनलाइन सामग्री, इत्यादि. या दोघांमध्ये काय फरक आहे ते खाली आम्ही स्पष्ट केले आहे.

Digital Marketing

डिजिटल मार्केटिंग मध्ये प्रत्येक वैयक्तिक साधन संभाव्यतेचे रूपांतर कसे करू शकते याचा विचार केल्या जातो. आणि एखाद्या ब्रॅंड चे प्रमोशन किंवा मार्केटिंग वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वर केल्या जाते. म्हणजे या मध्ये टार्गेट ठरवल्या जात नाही.

Inbound Marketing

इनबाउंड मार्केटिंग (Inbound Marketing in Marathi) ही एक समग्र संकल्पना आहे. या मध्ये प्रथम टार्गेट ठरवल्या जाते आणि मग लक्षित टार्गेट पर्यन्त कोणते साधन हे प्रभावितपने पोहचेल याचा विचार केला जातो आणि मग नंतर त्याची अमलबजावणी केल्या जाते. जसे की समजा आपले टार्गेट हे Website Hosting ला Promote करणे हे आहे, तर Inbound Marketing मध्ये आधी ठरविल्या जाते की आपले टार्गेट योग्य व्यक्ति पर्यंत जाण्यासाठि कोणते साधन योग्य राहील किंवा कोणता प्लॅटफॉर्म योग्य राहील आणि मग त्याची अमलबजावणी केल्या जाते.

आम्हाला माहीत आहे तुम्ही Digital Marketing आणि Inbound Marketing या दोघांमध्ये Confused झाला असाल, डिजिटल मार्केटिंग आणि इनबाउंड मार्केटिंग बद्दल लक्षात ठेवण्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक Marketing Professionals म्हणून, तुम्हाला 2 पैकी कोणताही एक पर्याय निवडण्याची गरज नाही. खरं तर, ते एकत्रच चांगले काम करतात.

डिजिटल मार्केटिंग चे प्रकार (Types of Digital Marketing)

डिजिटल मार्केटिंग (Types of Digital Marketing in Marathi) चे खूप प्रकार आहेत त्यापैकि जे महत्वाचे आणि प्रभावी आहेत त्याबद्दल सविस्तर पाहू,

1) Search Engine Optimisation (SEO)

Google Search Result मध्ये व्यवसायाला उच्च स्थान मिळवून देणे, आणि एखाद्या Website वर Traffic वाढवणे हे SEO मुख्य चे ध्येय आहे. SEO करणे म्हणजेच वेबसाइट ला सर्च इंजिन मध्ये Optimise करणे होय. आता हे optimisation वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते जसे की एखाद्या Particular Keyword ला रॅंक करण्यासाठी वेबसाइट वरचा कंटेंट Optimise करणे.  SEO मध्ये खालील गोष्टी समाविष्ट असतात.

  • Content indexing:- एखाद्या गोष्टीचे प्रमोशन करतांना सर्वात महत्वाचे असते की तुम्ही ज्या गोष्टीचे प्रमोशन तुमच्या वेबसाइट वर करत आहात त्यासाठी तुमची Property ही सर्च इंजिन मध्ये इंडेक्स करावी लागते सर्च इंजिन मध्ये इंडेक्स होईल तेव्हाच तुमच्या कंटेंट वर ट्रॅफिक येईल.
  • Good link structure:- तुमच्या साइटवरील सर्व सामग्री सहजपणे शोधण्यासाठी सर्च इंजिन तुमचा कंटेंट Crawl करतात त्यासाठी तुम्हाला Search Engine मध्ये तुमचा कंटेंट इंडेक्स करावा लागतो.
  • SEO Friendly Article:- या मध्ये तुम्ही लिहिलेले आर्टिकल हे SEO Friendly असावे म्हणजे, पद्धशिर लिहिलेले असावे, त्यात तुम्ही फोटोस अॅड केलेले असावे, Targeted Keywords असावे इत्यादि.

2) Pay Per Click (PPC)

Pay Per Click (PPC) म्हणजे पैसे भरून सर्च इंजिन मध्ये मिळवलेले रिजल्ट होय. हा डिजिटल मार्केटिंगचा एक अल्प-मुदतीचा प्रकार आहे, याचा अर्थ असा की जोपर्यंत तुम्ही जाहिरातीसाठी पैसे भरता तोपर्यंत तुमची Advertisement लोकांपर्यंत पोहचेल. तुम्ही गूगल वर एखाद्या वेळेस काही सर्च केले असेलच सर्वात वर तुम्हाला काही रिजल्ट दिसतात त्यावर जाहिरात असे लिहिलेले असते त्यालचा PPC असे म्हणतात म्हणजे त्या जाहिराती ह्या Paid असतात. डिजिटल मार्केटिंग मध्ये PPC ला खूप महत्व दिल्या जाते कारण PPC मार्फत तुमची जाहिरात ही Targeted Audience पर्यंत पोहचते.

3) Social Media Marketing

सध्या सोशल मीडिया ला खूप महत्व आहे कारण सध्या सर्वात जास्त Audience ही Social Networking Sites वर असते. आपल्या एखाद्या ब्रॅंड चे प्रमोशन करण्यासाठी Social Media हा बेस्ट पर्याय ठरू शकतो. Social Media Marketing in Marathi मध्ये तुम्ही तुमचा ब्रॅंड Facebook, Instagram, Twitter या सारख्या Social Networking Sites वर Promote करू शकता या साठी तुम्हाला काही पैसे सुद्धा मोजावे लागतील आणि विशेष म्हणजे Facebook किंवा Instagram वर प्रमोशन करते वेळी तुम्ही निवडू शकता की तुम्हाला कोणत्या एरिया मध्ये जाहिरात करायची आहे, कोणत्या देशात करायची आहे, कोणत्या वयोगटाच्या लोकांपर्यंत जाहिरात पोहचवायची आहे इत्यादि त्यामुळे तुमचा Brand हा Targeted Audience पर्यंत पोहचु शकतो.

4) Content Marketing

Content Marketing ही एक Strategic Marketing आहे जी स्पष्टपणे परिभाषित प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी मौल्यवान, संबंधित आणि सातत्यपूर्ण सामग्री तयार आणि वितरित करण्यावर केंद्रित आहे.

5) Email Marketing

Email Marketing in Marathi मध्ये वेगवेगळ्या ग्रुप्स च्या लोकांना ईमेल पाठवून आकर्षित केल्या जाते.

6) Affiliate Marketing

Affiliate Marketing in Marathi मध्ये एखाद्या ब्रॅंड चा प्राचर केल्या जाते. आणि तो ब्रॅंड लोकांना विकत घेण्यासाठी प्रोत्साहित केल्या जाते. जसे की Website बनवतांना Hosting ची आवश्यकता असते तुम्हाला ती होस्टिंग विकत घ्यावी लागते, तुम्ही तुमच्या होस्टिंग चा प्रचार करू शकता जेणेकरून लोक आकर्षित होतील आणि तुमच्या Affiliate Link वरुण होस्टिंग विकत घेतील, जर कोणी तुमच्या लिंक वरुण होस्टिंग विकत घेतली तर तुमची होस्टिंग कंपनी तुम्हाला त्या Sell वर commission देते आणि ही commission खूप मोठी सुद्धा असू शकते.

मित्रांनो, Digital Marketing in Marathi बद्दल ची आमची ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा. आणि Digital Marketing Meaning in Marathi बद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कमेन्ट टाकून आम्हाला नक्की विचारा.

शेअर करा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.